‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास… वटपौर्णिमेला खा. सुप्रिया सुळे यांचा उखाणा

0
963

खासदार सुप्रिया सुळे या अमरावती जिल्हा दाै-यावर आहेत. अमरावती येथे सुळे यांनी महिलांसमवेत वटपाेर्णिमा साजरी केली. या सणात विधवा महिलांना देखील त्यांनी सहभागी करुन घेतले. त्यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील त्यांनी आयाेजित केला आहे. दरम्यान वडाला फे-या मारल्यानंतर सुळेंना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला. यावेळी सुळे म्हणाल्या ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा गजर करीत ज्येष्ठ महिलांनी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दिर्घायुष्य लाभाे असे आशीर्वाद दिले.