अजितदादाच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच माझीही इच्छा!

0
42

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन कार्यक्रम मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक इच्छा बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसण्यात फार रस नव्हता. सर्व आमदारांनी सह्या केल्या आणिन त्यांच्या आग्रहाखातर मी विरोधी पक्षनेता झालो. एक वर्ष हे पद सांभाळतोय. पण आता मला या पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा आणि मला पक्ष संघटनेची जबाबदारी द्या. त्या पदाला न्याय द्यायचं काम करेन, असं अजित पवार म्हणाले. त्यावर आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादाची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे. अजितदादाला संघटनात्मक पदावर संधी द्यायची की नाही संघटनात्मक निर्णय आहे, असं त्या म्हणल्या.

मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारलाय. दादाला प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.