Tata Cars Discounts July
टाटा मोटर्सच्या लोकप्रिय कार टियागोवर 35,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत, ज्यात 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. जर तुम्हाला Tata Tiago चे CNG मॉडेल विकत घ्यायचे असेल, तर 30,000 रुपयांची रोख सवलत, 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे, तुम्ही 45,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
Tigor iCNG मॉडेलवर जुलैमध्ये 50,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. 5,000 कॉर्पोरेट सूट, 35,000 रुपये रोख सूट आणि तुम्ही एक्सचेंज बोनस अंतर्गत 10,000 रुपये वाचवू शकता. Tata Harrier ला 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि अतिरिक्त फायदे दिले जात आहेत.
Tata Altroz-
Tata Altroz च्या पेट्रोल व्हेरियंटवर 23,000 रुपयांपर्यंत सूट आहे. 10,000 रोख सूट, 3,000 कॉर्पोरेट सूट आणि 10,000 एक्सचेंज बोनस उपलब्ध आहेत.
प्रीमियम हॅचबॅकच्या डिझेल व्हेरिएंटवर 28,000 पर्यंत बचत करू शकता, ज्यामध्ये 10,000 चे एक्सचेंज बोनस, 15,000 ची रोख सवलत आणि 3,000 कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या टिगोर कॉम्पॅक्ट सेडानवर 35,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे, या कारवर 20,000 कॅश डिस्काउंट, 5,000 कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10,000 एक्सचेंज बोनसचा लाभ मिळत आहे.