महाराष्ट्र सरकारने राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. यामुळे आता सर्व शिक्षकांना शाळांमध्ये टी शर्ट, जीन्स परिधान करता येणार नाही. तसेच प्रिन्ट आणि डिझाइन असलेले कपडे वापरता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. हा आदेश फक्त सरकारी नाही तर खासगी शाळांमध्ये लागू असणार आहे. यामुळे सर्वच शिक्षकांना शाळांमध्ये सोबर कपडे परिधान करावे लागणार आहेत.
शिक्षकांना शाळांमध्ये टी शर्ट, जीन्स वापरता येणार नाही. शिक्षकांना प्रिंट असणारे शर्ट वापरता येणार नाही. महिला आणि पुरुष शिक्षकांना ड्रेस बरोबर फुटवेअर घालण्याचे म्हटले आहे. पुरुषांनी बूट वापरावे, असे आदेशात म्हटले आहे. शिक्षकांनी घातलेला ड्रेस स्वच्छ असायला हवा. इन केली गेली पाहिजे. महिला शिक्षकांना साडी किंवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा वापरता येणार आहे. पुरुष शिक्षक शर्ट आणि पॅन्ट परिधान करु शकतात. सरकारने शाळांना ड्रेस कोड निवडण्याचा सल्ला दिला आहे. पुरुष शिक्षकांचा ड्रेस कोड हलक्या रंगाचा असला पाहिजे. स्काउट गाइड शिकवणाऱ्या शिक्षकांनी स्काउट गाइडचा ड्रेस घातला पाहिजे. एखाद्या शिक्षकास वैद्यकीय कारणामुळे बूट वापरणे शक्य नसेल तर त्यांना सुट दिली गेली पाहिजे.






