तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री ? औरंगाबादच्या सभेत व्यासपीठावर उपस्थिती

0
908

औरंगाबादेतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मुंबईतून शिवसेनेचे दिग्गज नेते हजर होते. तर, संपूर्ण ठाकरे कुटुंबही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब या सभेला उपस्थित होते. नेहमीच राजकीय कार्यक्रमापासून आणि राजकारणापासून दूर राहणारे तेजस ठाकरे या सभेत भगवं उपरणं परिधान करुन मंचावर दिसून आले. आपल्या आई शेजारी ते वडिलांची, शिवसेना पक्षप्रमुखांची सभा ऐकायला आले होते. त्यामुळे, त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तर, आदित्य ठाकरेंचं मुंबईत लाँचिंग झाल्यानंतर तेजस ठाकरेंचं औरंगाबादेतून शिवसेनेनं लाँचिंग केलंय, अशी चर्चाही सभास्थळी रंगली होती.