नवी दिल्ली : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी दिल्लीत पोहोचून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपनं महाराष्ट्र , झारखंड, राज्यात प्रादेशिक पक्षाचं काय केलं बघितलं, जो घाबरेल त्याला त्याला ईडीचा धाक दाखवून घाबरवलं आणि जो खरेदी करता येईल त्याला खरेदी केलं, पण बिहारी विकला जाणारा नाही, असे म्हणत शिंदे गटालाही टोला गवाला आहे. भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली आहे, आता आम्ही आणि नीतीश कुमार एकत्रित आहोत, सगळ्या विरोधी पक्षांनी आता एकत्रित बसण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना केलं आहे.