भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सोलापूर दौरा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. चंद्रशेखर राव हे सोलापूरच्या दिशेने रवाना होणार असून मंगळवारी सकाळी ते पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केसीआर हे मटण खाऊन पंढरपूरच्या वारीला जात असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, मटनाचा शाही बेत! पंढरी वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूरला येताना १० हजार वेळा विचार करा.पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका, असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा.
पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका.@TelanganaCMO pic.twitter.com/9eKupfbNZk— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 26, 2023