शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची पक्ष चिन्ह आणि पक्षाची लढाई निवडणूक आयोगासमोर होणार आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे याबाबत सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी दोन्ही गटानं पक्ष चिन्हाची तयारी सुरु केली आहे.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यष्यबाण निशाणी हवी आहे. पण धन्यष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं तर दोन्ही गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय का? कारण बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाकडून पक्षचिन्हाचं संकेत देण्यात आले आहेत.
शिंदे गटाची निशाणी “तलवार” असू शकते तर ठाकरे गटाची निशाणी “गदा” हे चिन्ह असू शकते. बुधवारी झालेल्या या दसरा मेळाव्यात दोन्ही गटानं जवळपास चिन्हांसाठी प्लॅन बी तयार केलाय की काय असंत वाटत होतं. हिदुत्वांचे विचार पुढे घेऊन निघालेले दोन्ही गट एकमेकांवर प्रहार करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत आणि युद्धात लागणा-या शस्त्रांचा वापर दोन्ही गट निवडणुक चिन्ह म्हणून वापरण्याची शक्यता आहे. बीकेसीमध्ये तलावारीचं पुजन करून दस-या मेळाव्याला सुरुवात केली तर दुसरीकडे विरोधकांवर शिवतीर्थावर देखील शस्त्रपुजन करण्यात आलं पण प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदेचा वारंवार उल्लेख करण्यात आला.






