मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात गोळीबार, कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या

0
679

ठाण्यातील नौपाडा आणि येऊर भागात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाले. या गोळीबारात कुख्यात गुंड गणेश जाधव हा याचा मृत्यू झालेला आहे. या गोळीबार प्रकरणी ठाणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. विपीन मिश्रा, सौरभ शिंदे , सुरज मेहरा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. आपसातील वादातून आरोपींनी हा गोळीबार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
नौपाडा येथील घंटाळी परिसरात शुक्रवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथे रिक्षा मधून तीनजण आले होते. त्यांनी येथील बांधकाम व्यवसायिक बाबा माने याच्या कारची काच फोडली. परिसरात आरडाओरड झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर तिघेही निघून गेले. काहीवेळाने पुन्हा हे तिघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील दुकानात काम करणारा अश्विन गमरे याच्या छातीखाली डाव्या बाजूस गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर तिघेही आरोपी पळून गेले.