शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेला आज मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक नगरसेवक शिवसेनेतून फुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र एक नाही दोन नाही तर अवघी उद्धव ठाकरेंची शिवसेनाच रिती झाली. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या एकूण 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता उद्धव ठाकरेंकडे एकच नगरसेवक राहिला. या परिस्थितीवर मनसे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर ही वेळ आल्याचं ट्वीट त्यांनी केलंय. खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
'चमत्कार बाबा'संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला😅
त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख …
सौ दाऊद,एक राऊत …😍— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 7, 2022






