अहमदनगर मनपा अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
नगर ; अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते यामध्ये अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने भाग घेऊन आपली कला सादर करत असतात, धकाधकीचे जीवन जगत असताना मनोरंजन तसेच आनंददायी जीवन जगण्यासाठी आपलय संस्कृती व पारंपारिक गीतांवर आधारित सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी अधिकरी कर्मचारी यांनी विविध गीतांचे सादरीकरण करत सहभाग नोंदवला, यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे, उपायुक्त सपना वसावा, लेखाधिकारी डॉ, सचिन धस, लेखापरीक्षक विशाल पवार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, वैभव जोशी आदींसह कर्मचा-यांनी सदाबहार गीते सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.