अहमदनगर जिल्ह्यात: मुख्याध्यापकाकडून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यास व्हॉट्सअॅपवरून जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यात घडला.याबाबत बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर (वय ४५) यांनी रविवारी (दि.२८) छावणी पोलिस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे राक्षी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पोपट दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.
डॉ. शंकर गाडेकर यांनी राक्षी शाळेस भेटी दरम्यान, मुख्याध्यापक पोपट सूर्यवंशी यांच्या गैरहजेरीबाबत रिपोर्ट तयार केला. त्यामुळे सूर्यवंशी यांनी तक्रार केल्याच्या रागातून शनिवारी (दि.२७) रात्री डॉ. गाडेकर यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅपवर सात खळबळजनक असे मेसेज पाठविले. यामध्ये प्रथम राहुरीतील वकील दाम्पत्यांच्या निर्घृण खुनाच्या बातमीची,लिंक पाठवून रिड केअरफुली, काळजी घ्या आणि ओव्हरटेक करणार आहात का? तर करा पण अॅक्सिडेंट झालाच तर? असे खळबळजनक मेसेज पाठवून ‘वळवळ झालीच तर सल्ला नाही पण विनम्र होऊन सांगेल, मेसेज सूर्यवंशीचा आहे, असे म्हटले आहे. याबाबतची तक्रार गाडेकर यांनी दिली.
संबंधित मुख्याध्यापकास तक्रारीच्या अनुषंगाने नोटीस बजावली आहे. अजून खुलासा मिळालेला नाही. सदरील प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.तृप्ती कोलते,गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, शेवगाव.
सर्व शिक्षक एकाच माळेचे मणी समजून सर्व शिक्षकांची बदनामी कोणीही करू नये. अधिकाऱ्यांना असे मेसेज पाठवण्यात आले असतील तर या बाबीचा निषेध करतो प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.- बाबासाहेब तांबे शिक्षक बोधेगाव






