तपोवन रोडवर भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम पळविली

0
58

तपोवन रोडवर भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी
सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम पळविली
नगर – बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. आतील सामानाची उचकापाचक करुन बेडरूम मधील लोखंडी कपाटामधील सोन्या चांदीचे दागिने, व रोख रक्कम असा ६० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील नाना चौक येथे घडली.
याबाबत सुनीलकुमार पृथ्वीराज वर्मा (वय ३६, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, नाना चौक, तपोवन रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनीलकुमार वर्मा हे त्यांच्या घराला त्यांनी व्यवस्थित कुलूप लावून कुटुंबासह प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या भावाचा फोन आला की घराचे कुलूप, कडी, कोयंडा तुटलेला आहे. त्याने घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मधील लोखंडी कपाट उचकलेले होते. बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील एक जोड सोन्याचे कानातील टॉप्स, एक सोन्याची रिंग, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे एक मिनी मंगळसूत्र, आठ भाराचे चांदीचे पैंजण जोड, चार भाराचे दोन चांदीचे कडे, अर्धा ग्रॅम वजनाची नाकातील मुरणी, ६ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज मिळून आला नाही. सगळा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.