टायटन कंपनीचे बनावट पाकीट व गॉगल विक्री करणार्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी कोतवाली पोलिसांच्या मदतीने एस.एन.जी.सोलीसिटर कंपनीकडून नवीपेठेतील नेताजी सुभाष चौकातील शिवकृपा बेल्ट हाऊस या दुकानात ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान 313 पाकीटे, 20 गॉगल असा 18 हजार 15 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी गौरव श्याम नारायण तिवारी (वय 36 रा. न्यु दिल्ली) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवकृपा बेल्ट हाऊसचे संजय धनुमल तनवाणी (वय 50 रा. तारकपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तिवारी यांची एस.एन.जी.सोलीसिटर एल.एल.पी.नावाची कंपनी आहे.
टायटन कंपनी, लि. बेंगलोर, कर्नाटक या कंपनीच्या कोणत्याही मालाची नक्कल करून त्या वस्तू विक्री करीत असेल तर त्यांचेविरूध्द कार्यवाही करण्याचे अधिकार टायटन कंपनीकडून फिर्यादी तिवारी यांच्या एस.एन.जी.सोलीसिटर कंपनीला अधिकार पत्र देण्यात आले आहे. येथील नवीपेठेत शिवकृपा बेल्ट हाऊस दुकानात टायटन कंपनीचा बनावट मालविक्री होत असल्याची माहिती तिवारी यांच्याकडे प्राप्त झाली होती






