Toyota Fortuner टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने टोयोटा फॉर्च्युनर कार आता नवीन अवतारात लाँच केली आहे. ही कार भारतात सर्वात आधी २००४ मध्ये लाँच केली होती. गेल्या १८ वर्षांपासून ही कार भारतीय रस्त्यांवर रुबाबात मिऱवतेय. आता या कारचं नवीन मॉडेल बाजारात दाखल झालं आहे. नवीन कारचं नाव टोयोटा फॉर्च्युनर जीआर-एस एडिशन असं आहे. कंपनीने या कारची किंमत ४८.४३ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी निश्चित केली आहे. ही टॉप व्हेरियंट कार असेल.
कंपनीने टोयोटा फॉर्च्युनर जीआर एस केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. हे फुलली लोडेड व्हर्जन आहे, तसेच हे डिझेल 4X4 एटी ट्रिमसह येतं. यात स्टार्ट-स्टॉप बटन देण्यात आलं आहे. यात नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्पोर्टियर पेडल्स मिळतील. कंपनीने या कारमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे ही कार रेग्युलर फॉर्च्युनरपेक्षा वेगळी भासते.
या कारमध्ये ब्लॅक आऊट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच, यात डुअल टोन रेडिएटर ग्रिल देण्यात आलं आहे, ज्यामुळे या कारला स्पोर्टी अपील मिळतो. पुढच्या बाजूला दिलेल्या ग्रिलमध्ये जीआर बॅज देण्यात आला आहे. याला फेंडर आणि बूट लिड देखील मिळेल. या कारच्या स्टीअरिंग व्हील्सवरही जीआर बॅज वापरण्यात आला आहे.