उद्धव ठाकरेंची मोदींसोबत युतीसाठी, तासभर चर्चा बंडखोर खासदाराचा गौप्यस्फोट!

0
1030

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी केला

कित्येक वेळा उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं ते आम्हाला म्हणाले. मी स्वत: चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली नाही. आमच्या चार पाच बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीतही आम्ही युती करायला तयार आहोत. पण मला सहकार्य मिळत नाही. आम्ही सर्व त्यावेळी प्रयत्न करत होतो.शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाल्याचं खासदार राहुल शेवाळे सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यावेळी ही चर्चा झाल्याचं स्वत: उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.