निवडणूक आयोगाचा ‘हा’ अंतिम निर्णय नाही, तर..उज्ज्वल निकम

0
1165

शिवसेना’ नाव तसेच चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्य निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व त्याच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही, दोन्ही पक्षांकडून पुरावे सादर करणे, लागणारा युक्तिवाद या गोष्टीना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता, निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले.

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते, दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला दोन्ही गट आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो. साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून निकालाने अपेक्षित असतं , निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत. आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो या दोन्ही गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत भवितव्य हे ठरेल असेही यावेळी उज्वल निकम यांनी सांगितले.