Video : महिलेनी घेतला भन्नाट उखाणा, मटणाचा रस्सा केला वाटून घाटून…..

0
26

उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही शुभ कार्य असो किंवा लग्न समारंभ उखाणा हा आवडीने घेतला जातो. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या. आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसतात.हा व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला उखाणा घेताना दिसतेय. तिच्या आजुबाजूला महिला उभ्या आहेत. ती उखाणा घेताना म्हणतेय, “मटणाचा रस्सा केला वाटून घाटून, विनायकराव काही आलेच नाही म्हणून मीच खाल्ला चाटून पुसून…” या महिलेचा हा भन्नाट उखाणा ऐकून तेथील इतर महिला सुद्धा जोरजोराने हसताना दिसतात. त्यातील एक महिला मजेशीरपणे म्हणते, “चोरी पकडली” हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मटणप्रेमींना तर हा उखाणा खूप आवडेल.