समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा….

0
51

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या सर्व आमदार खासदार उपनेत्यांची बैठक बोलावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर या बैठकीत ठाकरे गटांच्या नेत्यांकडून राज्यातील विविध मतदार संघांमध्ये याचा नेमका काय परिणाम होणार? या संदर्भात आढावा घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

समान नागरी कायद्यासंदर्भात ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.