ठाकरे टरबूज म्हणत असले तरी आमचे फडणवीस देखणे आहेत…

0
27

मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणाले पण आमचे देवेंद्र देखणे असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवस देखील मंत्रालयात आले नाही आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.