UPSC…IAS अधिकाऱ्याने शेअर केलं मुलाखतीचे कॉल लेटर…नेटकरी म्हणतात खूप प्रेरणादायी

0
34

UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. IAS किंवा IPS अधिकारी होण्यासाठी अनेक उमेदवार कठोर परिश्रम घेतात. IAS अधिकारी अवनीश शरण UPSCच्या उमेदवारांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी टिप्स देखील देतात. छत्तीसगड कॅडरच्या 2009 च्या बॅचच्या IAS अधिकाऱ्याने आता UPSC नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीचे आपले कॉल लेटर शेअर केले आहे.

कॉल लेटरमध्ये मुलाखतीची तारीख 13 एप्रिल 2009 देण्यात आली होती. मुलाखतीसाठी त्यांचे कॉल लेटर शेअर केल्यानंतर अनेक युजर्सनी त्यांच्या पोस्टला प्रतिसाद दिला. पोस्ट पाहिल्यानंतर काही युजर्सनी हे पत्र UPSC उमेदवारांसाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे.