उत्तर प्रदेशातही सरकारी अधिकाऱ्यांची लाचखोरी वाढत असल्याचे पाहायला मिळतेय. अशात गोंडा जिल्ह्यातून लाचखोरीची एक ताजी घटना समोर आली आहे. त्यात एका सरकारी अधिकाऱ्याला ५० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये सरकारी लेखापाल तक्रारदाराकडून कागदपत्रे तयार करण्याच्या बदल्यात लाच घेत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
एक व्यक्ती सरकारी अधिकाऱ्याकडे जमिनीची कागदपत्रे घेण्यासाठी येते. तो अकाउंटंटला सांगतो की साहेब, मी सतत चार दिवस फेऱ्या मारतोय; पण तुम्ही आमचे पेपर्स अजून तयार केले नाहीत. त्यावर अधिकारी म्हणतो की, तुम्ही कुठे पळत होता मला माहीत नाही. निदान बोहणी तरी करून घ्या. त्यावर ती व्यक्ती विचारते, ‘बोहणी करावी लागेल?’






