पुरुषांनी केली वटसावित्री पोर्णिमा… जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे…Video

0
27

संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावेळी महिला वडाची पूजा करत दिवसभर उपवास करत आहेत. सिंधुदुर्गात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात गेल्या चौदा वर्षांपासून पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी केली जाते आणि जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे… अशी प्रार्थना केली जाते. कुडाळ येथे गेल्या 14 वर्षांपासून वटपौर्णिमेला पुरुषमंडळी महिलांप्रमाणे यथासांग विधिवत वडाची पूजा करतात. वडाला फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात. नेहमी पत्नीनेच व्रत करायचं या रुढीला छेद देत पुरुषांच्या या अनोख्या धाडसी पावलाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.