VIDEO : सिंहाला भर रस्त्यावर गाडीत बसवून फिरवतोय तरुण

0
14

अनेक लोकं पाळी प्राणी पाळतात. आपल्या भारतात कुत्रा, मांजर, गाय, बकरी असे अनेक प्राणी पाळले जातात. वाघ, सिंह, बिबटे, चित्ते या सर्व जंगली प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवता येत नाही. पण काही असे देश आहेत जे जंगली प्राण्यांना पाळतात. त्यांना घरातील एका सदस्यांप्रमाणे प्रेम करतात. सध्या हा ट्रेंड खूप वाढत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक एका लक्झरी कन्व्हर्टिबल चालवताना दिसत आहे. त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर सिंह बसलेला दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती गाडी चालवताना दिसतोय. आणि त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर सिंह बसलेला दिसत आहे. सिंह खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहे.