अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिवांना दिलं आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नीलमताई गोऱ्हे ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने विधानपरिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत, त्यांना पक्षातर्फे निलंबनाची नोटीस पाठवली असता त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.
– श्री. @iambadasdanve, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद pic.twitter.com/Laq2XlO0qA
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 17, 2023