एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या उलथापालथी होत आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचीही 2 उभी शकले झाली. अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडून प्रमुख नेत्यांचा एक गट सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या एका खासदाराने केला आहे.
बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसचा एक गट लवकरच महायुतीत सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात राजकीय भूकंप होण्याची मालिका अद्याप संपली नाही. कारण, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व ज्येष्ठ नेते नाराज झालेत. हा गट लवकरच मोठा निर्णय घेऊन महायुतीमध्ये सहभागी होईल, असे ते खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
Home ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली! काँग्रेसचा मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत






