मोरया…मोरया… गणपती बाप्पा मोरया..ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला नगरकरांनी दिला निरोप

0
38

अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त आयोजित ‘श्रीं’ची विधिवत उत्थापन पूजा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व सौ. मीनाक्षी सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर विसर्जना मिरवणुकीला शहरात सुरूवात झाली आहे. यावेळी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थान अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे आदी विस्वस्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरया…मोरया… गणपती बाप्पा मोरया”… “एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार”… “गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमूला आहे. भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे.