जालना जिल्ह्यामधील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर राज्यभरात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटले आहे.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाजातील नागरिकांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही अशी शपथ बीड तालुक्यामधील बेलवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना मारहाण केल्यामुळे बेलवाडी गावच्या नागरिकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रात भाजपाची सत्ता आहे,
आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाही. अशी शपथ बेलवाडीमधील नागरिकांनी घेतली आहे.