माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात अडकला आहे. यावेळी त्याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. विनोद कांबळी विरोधात पत्नीनेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विनोद कांबळीने दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केलाय. वांद्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी विरोधात IPC च्या कलम 324 आणि 504 अंतर्गत FIR नोंदवण्यात आलाय. बायकोवर कुकिंग पॅन फेकून मारल्याचा आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.






