गाईचा चावा घेणाऱ्याला मिळाली अशी शिक्षा, व्हायरल व्हिडिओ

0
25

काही महाभाग असेही असतात ते त्याही परिस्थितीत प्राण्यांची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागते.त्यांना त्रास दिल्यावर किंवा त्यांची शांतता भंग केल्यावर ते रागाच्या भरात काय करतील याचा काही नेम नाही. अशा प्राण्यांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून एका व्यक्तीनं चक्क गाईची शेपूट चावली आहे, त्याच्या या कृत्याची त्याला लगेच शिक्षाही मिळाली आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने चक्क गाईची शेपूट हातात घेऊन तिला स्वत:च्या कपड्यात गुंडाळून चावली आहे, यानंतर गाईला प्रचंड वेदना झाल्या असतील हे व्हिडीओमधून दिसत आहे. त्यामुळे गाईनेही क्षणात त्या व्यक्तीला इंगा दाखवला. गाईने जोरात त्याला तशील पाठीमागे लाथ मारली. ही लाथ त्या व्यक्तीला इतक्या जोरात लागली की तो सुद्धा कळवळत खाली बसला.