एका घरगुती क्लासमध्ये शिकणाऱ्या चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ही लहान मुलगी अभ्यास करून खूपच वैतागली आहे. तिच्या शिक्षिकेने तिला वहीची तीन पाने भरून अभ्यास करण्यास सांगितलं होतं. पण तिला एवढा अभ्यास करण्याचा कंटाळा आला होता. तिची शिक्षिका तिला अभ्यास करण्यास सांगत होती, मात्र ही चिमुरडी मात्र तिला सतत नकार देत होती.
शिक्षिका या मुलीला वहीची तीन पाने भरून अभ्यास करण्यास सांगते. ती मुलीला म्हणते की इतर मुलं पाच-पाच पाने भरून अभ्यास करतात. त्यावर ही मुलगी म्हणते, “कंटाळा येतो गं मला अभ्यास करून.” या मुलीचं त्रासिक पण तितकंच लडिवाळ बोलणं सर्वांनाच आवडलं आहे