मस्ती की पाठशाला…विंडीज विरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीचा भन्नाट डान्स..

0
65

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. १७१ धावांची शानदार खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा किताब देण्यात आला. जैस्वालने १७१ धावा केल्या आणि रोहितने १०३ धावांची खेळी केली. याशिवाय विराट कोहली ७६ धावा करून बाद झाला.विराट कोहली आपले शतक पूर्ण करू शकला नाही पण त्याने चाहत्यांचे अन्य मार्गाने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी जेव्हा टीम इंडिया मैदानावर उतरली तेव्हा कोहलीने संधी साधत काही वेळ मैदानावर डान्स करत घालवला. शतक हुकल्याची निराशा कोहलीच्या चेहऱ्यावरून दिसत नव्हती आणि तो आपल्या नृत्यात मग्न दिसत होता. कोहलीच्या डान्सचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही आवडला.