नगर – मतदनाचा टक्का वाढून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शहरात मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती करुन नागरिकांना मतदान कार्डचे वितरण माजी महापौर शिलाताई शिंदे व माजी नगरसेविका आश्विनीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
मंगल गेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक दिगंबर गेंट्याल, महिला आघाडीच्या सलोनी शिंदे, सचिन चव्हाण, विजय जाधव, नाना सापटे, राजू शिंदे, कौशल आगळे, कल्याणी आगळे, सुनंदा वाडेकर, अर्पिता वाडेकर, शोभा हुंडेकरी, शशिकला म्हस्के, अल्ताफ शेख, तंजीला शेख, असिफ पठाण, सलमा शेख, आसरा शेख, युसूफ शेख, मुख्तार शेख, खलील शेख, यास्मिन शेख, हसीना शेख, सारिका दिवटे आदी उपस्थित होते.
आश्विनीताई जाधव म्हणाल्या की, प्रत्येकाच्या मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे. समाजाचा विकास साधण्यासाठी व योग्य उमेदवार निवडून देण्याकरिता मतदान महत्त्वाचे ठरते. आपल्या मतातांनी चांगला व सक्षम उमेदवार निवडून आल्यास, त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतात. सर्व प्रौढ मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने नवमतदार व मतदार यादीतून नावे गळालेल्या व दुरुस्ती असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन त्यांना मतदान कार्डचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिलाताई शिंदे म्हणाल्या की, सर्व नागरिकांनी जागृक राहून आपले मतदार यादीत नाव समाविष्ट झालेले आहे की नाही? हे पहावे. मतदानाच्या दिवशी काही त्रुटी आढळल्यास त्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. लोकशाहीत प्रत्येक नागरिकांच्या मतदानाला महत्त्व आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या मतातून लोकशाहीला बळ मिळणार असून, योग्य उमेदवार निवडून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानाच्या माध्यमातून शिवसेना कार्यालयात मतदार नोंदणी सुरु असून, सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले आहे.






