दादर रेल्वे स्टेशनवरील एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका भाजी विक्रेत्या महिलेनं हिरव्या भाज्या चक्क स्टेशनवर साचलेल्या गढूळ पाण्यात धुतल्या. अशुद्ध पाण्यात कोथिंबीर धुतल्याचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भाजीचा हा व्हिडीओ आमची मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, दादर रेल्वे स्थानकावर एक भाजी विक्रेती पाईपमध्ये असलेल्या गढूळ पाण्यात भाजी धुवताना दिसत आहे.