Wild life….एक जिराफ व 6 सिंह आमनेसामने… अटीतटीची झुंज…कोण जिंकले ? व्हिडिओ

0
1652

Wild life…
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. सामान्यतः एकटा सिंह हा जंगलातल्या सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक प्राण्यांना सहज नियंत्रित करतो. परंतु या व्हिडीओमध्ये असं काहीही घडलं नाही. जंगलात सिंहाच्या कळपाने प्रौढ जिराफाची शिकार करण्यासाठी सापळा रचल्याचे दिसून येतंय. सिंहांचा कळपही यामध्ये यशस्वी झाला. यामध्ये सिंहाने जिराफाला पाठीमागून पकडलं तर काहीजण जिराफाचे मागचे पाय जबड्यात दाबून बसले आहेत. आणखी एक सिंह जिराफच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु इतका सापळा रचूनही सिंहाना मात्र त्यांच्या शिकारीत यश मिळत नाही.

या व्हिडीओमध्ये जिराफ ज्या पद्धतीने सहा सिंहाच्या कळपाला तोडीस तोड उत्तर देतोय, हे पाहणं फारच रंजक आहे. एकामागोमाग एक सिंह या एकट्या जिराफावर अगदी तुटून पडलेला आहे. मात्र जिराफानेही धीर सोडला नाही आणि चारही बाजूंनी वेढलेला असतानाही तो पहाडासारखा उभा राहिला. उलट अनेक सिंहांना ओढून आपले पाय पुढे खेचले. आपण पाहू शकता की सहा सिंह एकत्र जिराफापुढे मान टेकवू शकले नाहीत आणि सर्वांना माघार घ्यावी लागली. या व्हिडीओमध्ये सुमारे दीड मिनिटांची टाइमफ्रेम पाहण्यासारखी आहे.


हे सुध्दा वाचा…
चिमुरड्या मायराला’चंद्रमुखी’ची भुरळ…चंद्रा गाण्यावर भन्नाट डान्स