जत्रेवरून परत येताना फोरव्हिलरचा अपघात नगर मधील दोघांचा मृत्यू

0
2145

अहमदनगर प्रतिनिधी :पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे काल रविवार दि. 17 रोजी जत्रेचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम उरकून नगर कडे चारचाकी वाहनाने परत येत असताना नगर पुणे रोड वरील सुपा परिसरात गाडीवरचा ताबा सुटला भरधाव वेगात कंटेनरला पाठीमागून धडकून हा अपघात झाला या अपघातामध्ये प्रसिद्ध मूर्तिकार बबन गोसके (वय ६०)व मनपा सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश गोरे (वय६७)यांचा अपघाती मृत्यू झाला तर मनपा वाहन चालक कर्मचारी प्रशांत पवार अपघातात गंभीर जखमी झाले