राजकारणी ते निवडणूक विश्लेषक बनलेल्या योगेंद्र यादव यांनी मोठा दावा करत मोदींसह भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. द वायर’ या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ये निकालापूर्वीच यादव यांनी इंडिया आघाडी एनडीएपेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगत भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे म्हटले आहे.सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे गणित मांडत शेवटच्या टप्प्यात भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधून धक्का मिळू शकतो. यामुळे इंडिया आघाडी भाजपला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार भाजपला 250 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 230 पर्यंतही असू शकतो.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 2019 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल आणि साधारण 90 ते 100 जागांवर विजयाचा गुलाल उधळेल असे यादव म्हणाले.






