अहमदनगर पुन्हा हादरलं ! तरूणाच्या मृतदेहाचे तुकडे पाटात सापडले

0
20

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका पुन्हा हादरला आहे. कारण नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पाटात एका तरूणाच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तरूणाच्या शरिराचे तुकडे करून पाटातील पाण्यात फेकून दिल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

एका अनोळखी व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून गोणीमध्ये भरून पाटाच्या पाण्यात फेकून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे घडली आहे. गावालगत असणाऱ्या पाटामध्ये अंदाजे २५ ते ३० वर्ष वय असलेल्या एका अनोळखी पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. त्यामुळे देडगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

देडगाव परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद ससाने यांनी तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुकाणा दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस नाईक किरण पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केलाय.

ही घटना वीस दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाच्या मिळालेल्या तुकड्यांची तपासणी नेवासा फाटा येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली आहे. या मृतदेहाचे पाय, मुंडके, मांडी असे शरीराचे अवयव सापडले आहेत.