नागपूर जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा उघड झालाय. मृतकांच्या नावाची पेन्शन रक्कम स्वतः ्च जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात केली जात होती. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. यात कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आलं. जिल्हा परिषद सीईओ यांनी केली चौकशी समिती गठीत केलीय.
महिला लिपिकाकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी ‘हयात’ असल्याचे दाखवीत त्यांची पेन्शन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात त्या वळती करीत होत्या.






