Monday, May 20, 2024

अजित पवार म्हणाले…दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील वक्तव्यामुळे नारायण राणेंवर कारवाई होणार?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील वक्तव्यामुळे नारायण राणेंवर गुन्हा दाखल, कारवाई होणार? अजित पवार म्हणाले…
दिशा सालियन मृत्यू प्रकरणातकेंद्रीय मंत्री नारायण राणेयांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणी नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय तक्रार करायची… त्यात तथ्य असेल तर कारवाई होते त्यात तथ्य नसेल तर कारवाई होत नाही. अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही विधाने केली होती. दिशा सालियनची बदनामी केल्याचं सांगत तिच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडून नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles