‘आप’च्या खासदारकीचा ताप…. मराठी अभिनेता म्हणतो ‘तो मी नव्हेच…’

0
975

मुंबई: आम आदमी पार्टीने राज्य सभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्या सह प्रा. संदीप पाठक यांचा समावेश आहे. परंतु संदीप पाठक या नाम साधर्म्यामुळे मराठी अभिनेता संदीप पाठक यांच्यावर खुलासा करण्याची वेळ आली आहे. अनेक माध्यमांतून अभिनेता पाठक याचा फोटो वापरण्यात आल्या वर त्यानें आपचा तो उमेदवार मी नाही असा खुलासा केला आहे.