Thursday, May 9, 2024

अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा!

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज लोकसभेत पोहोचले. येथे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. राष्ट्रीय राजकारणातून ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत. अखिलेश यादव आता आमदार म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय राहणार आहेत.आता अखिलेश यादव विधानसभेचे सदस्य असताना विरोधकांची भूमिका ठामपणे पार पाडणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles