एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मुले झाली नगराध्यक्ष व नगरसेवक, संघटनेच्या वतीने सत्कार

0
521

नगर – एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त कर्मचारी स्व. सदाशिव औटी यांचे चिरंजीव विजय औटी नगरसेवकपदी निवडून येऊन त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तर सेवानिवृत्त कर्मचारी स्व. फुलाजी चेडे यांचे चिरंजीव अशोक चेडे आणि निवृत्त कर्मचारी कालकथित भिमराव नगरे यांची नात हिमानी बाळासाहेब (रामजी) नगरे यांची नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात एस.टी.चे ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी गणपतराव पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, डेपो सचिव माधवराव गाडीलकर, खजिनदार अर्जुन सबाजी औटी, ज्येष्ठ कामगार मनोहर महाजन, अय्युब शेख, एस.आर. शिंदे, निंबाळकर, लक्ष्मण ढवळे, एकनाथ औटी, पांडुरंग पवार, भास्कर औटी, नामदेव राहिंज, महेबूब राजे आदी उपस्थित होते.