Thursday, May 16, 2024

खिडकीची काच फुटली म्हणून मुख्याध्यापकाची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण…

नाशिकमधील जेलरोड भागात स्कॉटीश अकॅडमी शाळा आहे. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना चक्क गुराढोरासारखी अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एक साधी काच फुटली म्हणून मुख्याध्यापकाने शाळेतील जवळपास सहा ते सात विद्यार्थ्यांना मारले. त्यामुळे त्यांच्या दंडावर, छातीवर वळ उठले. यशराज ढिकले या विद्यार्थ्याची पाठ या मारहाणीमुळे सोलून निघाली होती.
इतक्या मारहाणीनंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याकंडे चक्क पाच हजार रुपयांची मागणीही केलीय. या प्रकरणी कुठे तक्रार कराल, पोलिसात जाल, तर तुमचे दहावीचे वर्ष बर्बाद करू, अशी धमकीही या महाशयांनी या विद्यार्थ्यांना दिली. यातल्या एका विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles