Friday, May 17, 2024

महाशिवरात्रीला बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

महाशिवरात्री निमित्त भाविक मोठ्या उत्साहात मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्याच दरम्यान झारखंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडमधील बाबाधाम मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था क्षणार्धात कोलमडली. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दर्शन काऊंटरजवळ चेंगराचेंगरी झाली.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने भाविकांवर लाठीमार केला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles