Monday, May 20, 2024

कोविड काळात आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी केलेले काम अतुलनीय : संभाजी लांगोरे

कोविड काळात आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी केलेले काम अतुलनीय : संभाजी लांगोरे
जिल्हा परिषदेत आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान
नगर : मागील दोन वर्ष करोना महामारीचा सामना करताना सर्वांनीच मोठी परीक्षा दिली. या काळात आशा स्वयंसेविका यांनी अतुलनीय असे काम केले. क्वारंटाईन सेंटर, गृहभेटी अशा अनेक कामांबाबत वरिष्ठांकडून सूचना दिल्या जायच्या. प्रत्यक्षात फिल्डवर जावून काम आशा स्वयंसेविकांनी केले. त्यांनी न घाबरता धाडसाने करोना काळात काम केले. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांचे मानवतेचे काम खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहे. एनआरएचएमसह आरोग्य उपक्रमांत नगर जिल्हा देशात, राज्यात पहिला आला आहे. यातही या त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जि.प.आरोग्य व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील 4 आशा स्वयंसेविका व 3 गट प्रवर्तकांना सन 2020-21 या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, डॉ.प्रकाश लाळगे, डॉ.अमोल शिंदे उदय देशपांडे आदी उपस्थित होते.
मंगल नगरे, कविता दराडे, सुरेखा खताळ, सुषमा परदेशी, सुष्मा कपाटे, संगीता भालेराव, सविता लेंडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळेम्हणाले की, गेल्या दोन वर्षात कोविड काळात आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी अतिशय चांगले काम केले. लसीकरणासाठीही त्यांनी भरीव प्रयत्न केले. केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच आरोग्य उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा लंके यांनी केले. सज्योत उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles