Monday, May 20, 2024

ऊस उत्पादक देशोधडीला…. विद्यमान लोकप्रतिनिधी काय करतायत? माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचा सवाल

Ram Shinde bjp…
Ram Shinde
कर्जत जामखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न विचार करायला लावणारा विषय बनला आहे, अशी भावना माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
फेसबुकवर पोस्ट करीत शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना लिहिले आहे की,
त्यांची कोणीही लूट करत आहे. कर्जत तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील तालुक्यातील कारखान्याने कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस मोठ्या प्रमाणात आणला जात आहे आणि स्थानिक शेतऱ्यांच्या अडचणी वाढीस जाणीवपूर्वक बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येते. आजच्या या परिस्थितीमध्ये ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्याचे खुप हाल होत आहेत . कारखान्याच्या तोडचिठ्ठी देणाऱ्या चिटबॉयपासून ते कारखान्याच्या कार्यकारी संचालकापर्यंत प्रत्येक जण त्याला त्रास देत आहे. साधी तोडचिठ्ठी देणारा चतुर्थश्रेणीचा कर्मचारी सुद्धा आपली किंमत वसूल करून घेतो. चिरीमिरी घेतल्याशिवाय तोडचिठ्ठी देत नाही. त्यानंतर ऊस तोड करणारे मुकादम तर जावयापेक्षा ही अधिक अडवनुक करतायत आणि कारखान्याचे अधिकारी डोळे झाक करतायत. ऊस तोडण्याची, मोळ्या बांधण्याची आणि उसाची वाहतूक करण्याची त्यांची ठरलेली मजुरी त्यांना कारखान्याकडून मिळत असताना, व तोडचिठ्ठीच्या क्रमाने एखाद्याचा ऊस तोडणे बंधनकारक असतानाही हा मुकादम आणि ऊस तोड कामगार पुन्हा शेतकऱ्याकडून भरपूर पैसे घेतोय आणि शेतकऱ्याची लूट करणाऱ्याच्या साखळीमध्ये सहभागी होतायत. कारखाना प्रशासन जाणीवपूर्वक शेतकऱ्याला अडचणीत आणते आहे. काही ठिकाणी निव्वळ शेतकऱ्याकडून पाच ते दहा हजार रुपये एकरी बक्षीस हवे असते तर काही जण भर पेहराव आणि हातभट्टीचा ड्रम एवढी बिदागी मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावायला तयार नाहीत, ट्रक्टर ड्रायव्हर सातशे रूपये हाती पडल्या शिवाय ट्रॅक्टर हलवत नाही. शेतकरी स्वताला कमनशिबाचा एक भाग आहे असे समजून ते सारे आपण भोगलेच पाहिजे. त्या पलीकडे काही इलाज नाही असे म्हणून कपाळाला हात लावून सतरा ठिकाणी स्वत चा अपमान कुठपर्यंत करून घ्यायचा या प्रश्नाने गांगरून गेला आहे. कारखान्याशी संबंधित असलेले सगळे घटक त्याची अशी अवहेलना करत आहेत. म्हणून शेवटचा उपाय म्हणून शेतकरी आपल्या पोटच्या मुला प्रमाणे सांभाळले पिक आज घडीला पेटवण्यातच धन्यता मानतो आहे . म्हणून गेल्या चार दिवसांत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपले ऊस स्वतःच्या शेतामध्ये पेटवून दिल्याचे प्रकार घडले त्याचाच भाग म्हणून माझ्या प्रवासा दरम्यान ,ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिली अन् मन शुन्न झाले. श्री जगदंबा सहकारी साखर (आत्ताचा अंबालिका) कारखान्या पासून दोनशे मीटर अंतरावर गेल्या चार दिवसा पुर्वी श्री मच्छिंद्र गावडे रा. बारडगाव सुद्रिक या शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाचे पिक पेटवण्याची वेळ आली. बारा महिने पोटच्या मुलाप्रमाणे खत, पाणी घालून सांभाळलेला ऊस , हा कारखान्याच्या उचित नियोजना अभावी शेतातच पेटवणे म्हणजे तालुक्यातील कृषी क्षेत्रासाठी अतिशय दु :खद आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. कारखाना परिसरातीलच शेतकऱ्यांवर अशा प्रकारची वेळ येते असेल तर तालुक्यातील इतर भागातील परिस्थितीचा विचार करणे क्षमतेच्या पलीकडीचे आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा मि गाडीतून खाली उतरलो व परिस्थिती पाहून विचारांच्या काहुराणे मनाने अस्वस्थ झालो. तोपर्यंत च हिंगणगाव येथील शेतकऱ्यांचा फोन आला व त्यांनी ही पुन्हा तोच दुर्दैवी निर्णय घेतल्याचे समजले, आणि पुढे पुणे येथे प्रवासास रवाना झालो असताना. प्रवासा दरम्यान दुपारी चारच्या सुमारास कोळवडी येथील शेतकऱ्यांच्या अशाच दुर्दैवी निर्णया संदर्भात समजले.एकुन परिस्थिती पाहता तालुक्यात गेल्या चार दिवसांत स्वतः ला ऊस जळीत हत्याकांडाचा भाग बनलेले शेतकरी म्हणजे
बारडगाव सुद्रिक
येथील

1) श्री मच्छिंद्र गावडे
2) श्री मोहन भिमराव गावडे
3) प्रकाश बाजीराव गावडे
4) संजय नामदेव गावडे
5) राजेंद्र नामदेव गावडे
6) वाल्मीक गोविंद गावडे
7) अशोक विश्वनाथ गावडे
8) उत्तम विठ्ठल गावडे

हिंगणगाव
येथील

1) श्री नानासाहेब सकाराम बरकडे

कोळवडी
येथील

1) श्री रघुनाथ तात्याबा कवडे
2)श्री दिलीप मारुती कदम
3)श्री देविदास महादेव कदम
4)श्री तात्या महादेव कदम
या शेतकऱ्यांचा शेकडो एकर शेतातील ऊस आणि शेती विषयी ची स्वप्नांचा आगडोंब उघड्या डोळ्यांनी पाहताना मानवी काळजाला झळा लागल्या शिवाय राहात नाहीत.शेती आणि शेती क्षेत्रावर आलेल्या या वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी डोळे उघडून पाहणार आहेत का❓
शासन व कारखाना प्रशासन योग्य ती कार्यवाही करणार आहे का❓
या सर्व परिस्थितीमध्ये योग्य प्रकारचे पावले उचलणे अपेक्षित आहे. अन्यथा शेतकरी देशोधडीला लागण्यास उशीर लागणार…..

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles