Monday, May 20, 2024

पतसंस्थेच्या लॉकरमधील सोन्यावर डल्ला, एका विरूद्ध गुन्हा दाखल

Crime..
संगमनेर शहरातील शारदा नागरी पतसंस्थेच्या लॉकरमधून अडीच लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाजणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शारदा नागरी पतसंस्थेच्या सोनेतारण लॉकरचा चार्ज संदीप नामदेव गुळवे याचेकडे होता. त्याने कोणाचीही परवानगी नसताना एकट्यानेच लॉकर उघडून त्यामधील खाते क्रमांक 5001732 मधील बॅगमध्ये ठेवण्यात आलेले अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये 46 ग्रॅम शुद्ध वजनाचे दागिने त्यात काळी पोत, गंठण पँडल, कान वेल, दोन अंगठी या दागिन्यांचा समावेश होता.

याबाबत व्यवस्थापक माधव भोर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप नामदेव गुळवे (रा. कर्‍हे, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles