Saturday, May 18, 2024

चाणक्य सूत्र…. मुलांवर संस्कार करायचे तर ‘या’ गोष्टी नक्की टाळा

भाषा सुधारणे तुमची मुलं तुम्हाला पाहून शिकतात. तुमची मुले सभ्य आणि सुसंस्कृत व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांची भाषा सुधारणे. यासाठी तुम्हाला त्यांच्यासमोर चांगली भाषा वापरावी लागेल. लहानमुलांसमोर अपशब्द बोलू नये यामुळे त्यांच्यावर वाईप संस्कार होतात.

खोटे बोलू नका अनेकवेळा पालक मुलांसमोर खोटे बोलतात किंवा मुलांना त्यांच्या स्वार्थासाठी खोटे बोलायला लावतात, यामुळे तुमची मुले खोटे बोलायला शिकतात. पुढे जाऊन त्यांची ही सवय तुमच्यासाठीच अडचणी वाढवू शकते.

परस्पर आदर ठेवा मुलांसमोर नेहमी एकमेकांशी आदरयुक्त भाषेत बोला. जर तुम्ही एकमेकांचा आदर करत नसाल तर तुमची मुलं तुमच्याकडून हे शिकतील. भविष्यात ते तुमचा अपमान करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. मोठ्यांचा आदर करा.

दोष शोधू नका घरात एकमेकांच्या उणीवा काढू नका. तसेच कोणाचाही अपमान करू नका. तुमची ही सवय तुमच्या मुलांना इतरांमधील दोष शोधायला शिकवेल. अशा परिस्थितीत मुलांची शिकण्याची क्षमता कमी होईल आणि ते इतरांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles