चित्रपटांच्या नावाखाली ‘कचरा’ विकू नका, कंगणाने दीपिका पदुकोनला हिणवले…

0
545

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये असते. आता कंगनाच्या निशाण्यावर थेट दीपिका पादुकोणच आहे. कंगनाने दीपिकाच्या गहराइयां या चित्रपटाबद्दल मोठे भाष्य केले आहे.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिग्गज अभिनेते मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्या चांद सी मेहबूबा या लोकप्रिय गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे गाणे हिमालय की लाप में या चित्रपटातील आहे. या गाण्यात मनोज कुमार नदीजवळ बसून गाणे म्हणतो आहे. त्याचवेळी माला डान्स करते. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘मी देखील इतरांसारखीच आहे, पण मला रोमान्स समजतो.नवीन युग, अर्जुन चित्रपटांच्या नावाखाली कचरा विकू नका. वाईट चित्रपट वाईट असतात. स्किन शो आणि पोर्नोग्राफी अशा चित्रपटांना वाचवू शकत नाही. कोणतीही खोल चर्चा नाही हे एक गहराइयां वाली गोष्ट आहे. खरं तर या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यात काही इंटिमेट सीन्स आहेत, ज्याबद्दल कंगनाने भाष्य केले आहे.